स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प🇮🇳
रायते-पिंपळोळी, प्रतिनिधी : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत रायते-पिंपळोळी कार्यालयाच्या आवारात तसेच जिल्हा परिषद शाळा रायते येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभक्तीमय वातावरणात ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन झाली. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेत आहोत, याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.
विकास आणि सेवेचा संकल्प
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन ग्रामपंचायत रायते-पिंपळोळीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. गावाचा विकास, नागरिकांच्या सुविधा आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमास सरपंच सौ. समिता संतोष सुरोशी, उपसरपंच कु. मयूर सुरेश सुरोशी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रामभाऊ सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार जैतुकाका मुठोळकर, श्री. नारायण सुरोशी, श्री. राम सुरोशी, सौ. गुलाबताई वाघे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य श्री. यतिन बुट्टेरे, श्री. हरेश पवार, तसेच श्री. लक्ष्मण मुठोळकर, श्री. गुलाब पवार, श्री. मनोज सुरोशी, विलास सोनावळे, भगवान पवार, एकनाथ सोनावणे, शशीकांत चांदणे, श्रीकांत तारसुळे, शरद पवार, मारुती सुरोशी, विलास गो. सोनावळे, अतिश सोनावळे, संतोष भोईर आणि प्रशांत पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी मानसी देसले, मनिषा जाधव, रायते हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कैलास बावस्कर, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, जि.प. शाळेच्या मुख्य शिक्षिका सौ. चित्रा बोंदे मॅडम, शिक्षिका अर्चना राठोड, सीमा जाधव, उपाध्यक्षा सी. राऊत मॅडम, अंगणवाडी सेविका सुनंदा पवार, अनिता बाधे, आशा स्वयंसेविका अनिता रा. सुरोशी व मदतनीस उपस्थित होते. याशिवाय यशस्वी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, युवक वर्ग, ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगली सांगता
कार्यक्रमात विद्यार्थी व मान्यवरांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सादरीकरणे केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. देशभक्तीपर वातावरणात अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments