'ओम नमो आद्या’च्या सुरेल सादरीकरणातून साधकांना सहजयोग ध्यानाचा अनुभव
विश्वमाता प. पूज्य श्री माताजी निर्मलादेवी स्थापित सहजयोगाद्वारे कल्याण शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिरात सहजयोग द्वारा साधकांना कुंडलिनी शक्तीचे जागरण व आत्मसाक्षात्काराचा अनुभव ओम नमोजी आद्या शीर्षकाखाली देण्यात आला. सहजयोग अभ्यास पद्धतीद्वारे श्री माताजी निर्मलादेवी यांनी विश्वातील सर्व धर्माचा एकत्र सार करून सहजयोगाची स्थापना केली. सहजयोग म्हणजे मानवाच्या जन्मापासून निर्मित झालेला योग म्हणजे मानवाच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती मध्ये असलेली शक्ती याद्वारे साधकांस आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. व ध्यानाच्या साधनेतून साधक शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. प.पूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांनी 5 मे 1970 साली नारगोल येथील समुद्रकिनारी आपले सहस्त्र आहार होऊन बारा साधकांना आत्मसाक्षात्कार दिला. जगातील 150 राष्ट्रात भारतीय संस्कृतीवर आधारित सहजयोगाचा अभ्यास करीत आहेत. सहजयोग ध्यान साधनेमुळे साधकांस आत्मिक शांती लाभते. रोग बाधा नष्ट होतात. कुटुंब वत्सल वाढते, विद्यार्थ्यांना चैतन्य प्राप्त होते. यामुळे विश्वातील बऱ्याच राष्ट्रांनी सहजयोग स्वीकारून अराजकता गुन्हेगारी, भोंदूगिरी, अनुषंगिक असे युद्ध असे मानवाची आत्मिकशांती नष्ट करणारे प्रकार सहजयोगामुळे थांबले गेले आहेत. यामुळे विश्वातील बलाढ्य राष्ट्रांनी इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, तुर्की, रशिया, जपान, नेपाल इत्यादी राष्ट्रांनी भारतीय अध्यात्मिक ऋषीमुनींच्या ग्रंथावरील सहजयोग स्वीकारून प. पूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांचे सन्मान केले आहे.
यातीलच एक भाग म्हणून कल्याण सहजयोग समूहाकडून कल्याण डोंबिवली भागातील नवीन लोकांना सहजयोगा पासून फायदे मिळावेत, त्यांना आत्मसाक्षात्कार मिळावा म्हणून कडोंमपा आचार्य अत्रे रंग मंदिरात शुक्रवार दिनांक 14/08/2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कल्याण शहरातील ख्यातनाम संगीतकार वझे परिवारातील चंद्रशेखर वझे यांचेभजनाद्वारे ओम नमो अध्याय संगीताद्वारे ध्यानाच्या माध्यमातून योगाचा अनुभव दिला. कल्याण डोंबिवली, कर्जत, अंबरनाथ येथील हजारो साधकांनी कुंडलिनी शक्तीचे जागरण करून आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला. या कामी विशेष परिश्रम गोविंद पवार, डॉ.राहुल बडगुजर, मिलिंद वाणी, राजू पवार, सुरभा फडणीस, नितीन पवार, अनिल थरकार, अनिल आवारी, सीमा दुदुसकर, उमेश भालेराव, सिद्धार्थ वाघमारे, विकास भालेराव, चैतन्य पवार, कल्पना खरात, दिपाली तायवडे, धनंजय सौ अर्चनाताई भांडारकर, सौ मनीषाताई पवार, सौ वाघमारे ताई, सौ शितलताई, सौ अनिता भारद्वाज, संगीता दीदी, आणि सर्व सहजयोगी भगिनींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली या भागातील बऱ्याच नवीन जुन्या साधकांनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments