Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

गुरुनाथ देसले यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश; कल्याण ग्रामीणमध्ये पक्षबांधणीला वेग

कल्याण तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ग्रामीण भागात पक्षबांधणीला वेग

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

काँग्रेसचे कल्याण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुनाथ देसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी देसले यांचे पक्षात स्वागत केले.सोमनाथ मिरकुटे यांनी मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पक्षबांधणीच्या कामाला वेग दिला आहे. ग्रामीण भागात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गुरुनाथ देसले यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे सोमनाथ मिरकुटे यांनी सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात पक्षाला नवी ऊर्जा मिळून संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आगामी काळात ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लवकरच भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा घेण्यात येईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments