Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

गणेश विसर्जन घाटांवर मूलभूत सुविधा पुरवा; कल्याण-डोंबिवली पालिकेकडे निवेदन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ४ मधील गणेश विसर्जन घाटांवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पॅनल क्र. ४ मधील माहने गणेश घाट, गाळेगाव मोहिली गणेश घाट, बल्याणी तलाव आणि उंभर्णी तलाव या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, विसर्जनाच्या वेळी भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी घाटांवर क्रेन किंवा हायड्राची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

रस्त्यांची दुरुस्ती आणि रोषणाईची मागणी

विसर्जन घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांची सध्या मोठी दुरावस्था झाली असून,खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आगामी गणेशोत्सव व धार्मिक कार्यक्रम लक्षात घेता या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. तसेच, विसर्जनाच्या रात्री भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशा विद्युत रोषणाईची (दिव्यांची) सोय करावी, अशी मागणी सौ. नमिता मयुर पाटील आणि रोहन पांडुरंग कोट यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती शहर अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि 'अ' प्रभाग क्षेत्राच्या सह-आयुक्तांना योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments