गोवेली येथे कर्जमुक्त शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रांचे वाटप; कल्याण ग्रामीणमधील नागरिकांनी मांडल्या वीजपुरवठा, वीजबिल, मीटर व नवीन वीजजोडणीच्या समस्या
गोवेली कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी बेबाकी प्रमाणपत्र आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जीवनदीप काॅलेजच्या हाॅलमधे करण्यात आले होते.शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बेबाकी प्रमाणपत्र वाटप करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार कथोरे साहेब म्हणाले की,शेती हा व्यवसाय आवडीचा राहील नाही.शेतीमधे बदल घडवण्याची गरज आहे.कर्ज घेवून त्या पैशाचा चांगला विनियोग व चांगला उपयोग झाला पाहिजे.तर शेतकऱ्यांना कर्ज फेडताना अडचण येणार नाही.सध्याची मानसिकता वाढत गेली आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत केला होता.राज्य सरकारने कर्ज माफीचा चांगला निर्णय घेतला.आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला.नुसता दिलासा दिला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माझ्या शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा कर्ज असे स्पष्ट शब्दात बँकाना सांगितले असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळावा यासाठी आज कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती बेबाकी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शेतकरी ज्या कामासाठी कर्ज घेतो त्या कामासाठी तो वापरला पाहिजे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्षभर पैसा वापरण्यासाठी देते. शेतकऱ्यांनी १२ महिन्याच्या आत कर्ज भरले पाहिजे. पुर्वी महिला बचत गटांना १०लाख कर्ज दिले जायचे आता २० लाख रुपये कर्ज तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २० लाख रुपये कर्ज दिले जाते होते आता ४० रुपये कर्ज मर्यादा वाढविली असल्याचे आमदार कथोरे साहेब यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर टि.डी.सी.बॅकेचे अध्यक्ष अरूण बाळू पाटील,उपनिबंधक सर्जेराव कांदळकर, संचालिका सौ स्मिता रविंद्र घोडविंदे, कल्याण बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे, दिनेश कथोरे, बाजार समितीचे संचालक अरूण पाटील, प्रतिक हिंदूराव,सुदाम पाटील, जयश्री सासे,बाळाराम कोर,सदा सासे,शेखर लोणे व इतर मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी टि.डी.सी.बॅकेचे अध्यक्ष अरूण पाटील व संचालिका सौ स्मिता घोडविंदे यांचा आमदार कथोरे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेश टेंभे सर यांनी केले.
दरम्यान, भाजपा कल्याण ग्रामीणच्या वतीने नागरिकांच्या महावितरण (MSEB) संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी विशेष जनता दरबाराचेही आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीजपुरवठा, वीजबिल, मीटर, नवीन वीजजोडणी आदी विविध समस्या व तक्रारी मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवून त्यावर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार किसन कथोरे यांनी दिले. नागरिकांच्या वीजविषयक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी कर्जमुक्तीपासून नागरिकांच्या वीज समस्यांपर्यंत विविध प्रश्नांवर थेट संवाद साधत आमदार किसन कथोरे यांनी नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
Post a Comment
0 Comments