कल्याणमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिटतर्फे प्रॉपर्टी प्रदर्शन १६ एप्रिल ते १९ एप्रिल रोजी कल्याण पश्चिम लालचौकजवळील फडकें मैदानात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. तसेच कल्याण डोंबिवली हाउसिंग संस्थांची संख्या वाढत आहे. सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच नागरिकांना परवडणारी घरे या भागात मिळतात. रिंग रोड तसेच मेट्रो प्रकल्प कामे सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की यावेळी एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष विकास जैन, सचिव साकेत तिवारी, यंदाच्या अध्यक्ष दिनेश महाडिक, माजी अध्यक्ष रवी पाटील आदिंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली असंख्य घरे बघण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच परवडणारी घरे उपलब्ध आहेत. सव्वा लाख ते एक कोटीपर्यंत ही घरे उपलब्ध आहेत. चाळीपेक्षा जास्त विकासक प्रदर्शनात सहभागी होणार असून जवळपास १५०हून अधिक प्रकल्प एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. टिटवाळ्यापासून ते ठाणे शिळफाटा रोड परिसरातील घरे उपलब्ध आहेत. चार दिवसांमध्ये जवळपास पंचवीस हजार नागरिक भेट देणार असल्याचे तसेच प्रदर्शनात घर बुकिंग केल्यास प्रत्येक ग्राहकाला भेटवस्तू व पन्नास हजार पर्यंत सवलत मिळणार आहे. प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. अभिनव गोयल, माजी मंत्री गणेश नाईक, महापौर हर्षल भोईर आदी उपस्थित राहणार आहेत. पाणीपुरवठ्यात नवीन जलस्त्रोत बांधण्याचे काम सुरु आहे. २८ टक्के पाणी चोरी होते त्यावर महापालिकेने कारवाई केली पाहिजे असे सांगितले.

Post a Comment
0 Comments