Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

केडीएमसीत महायुतीचा झेंडा; तिन्ही समित्यांवर बिनविरोध नेतृत्व!

बिनविरोध सभापती निवड!
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, शिक्षण समिती सभापती पदी अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी सारिका सतीश जाधव यांची निवड जाहीर ! कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, पूर्व प्रार्थमिक, प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव या उमेदवारांनी दि.02 एप्रिल 2026 रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केली होती. या तीनही समितींच्या सभापती पदासाठी केवळ एक-एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने,आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी यांस स्थायी समिती सभापती म्हणून, अभिजीत सुजाता सदानंद थरवळ यांस शिक्षण समिती सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते. मा.आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments