Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ६ एप्रिलला विविध समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

महापालिका स्थायी समिती सभापती, पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुर्नवसन समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी सोमवार दि. 06 एप्रिल रोजी  विशेष सभेचे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती, पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापती आणि महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुर्नवसन समितीच्या सभापती पदाच्या  निवडीसाठी सोमवार दि. 06 एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यासाठी गुरुवार दि. 02 एप्रिल रोजी संबंधित समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक लढु इच्छिणाऱ्या  समितीच्या सदस्यांनी सकाळी 10.30 ते दु. 05.30 या कालावधीत आपले नामनिर्देशन पत्र महापालिका सचिव यांचे कार्यालयात सादर करावयाचे आहे. सोमवार दि. 06 एप्रिल 2026 रोजी महापालिका भवनातील मा. स्थायी समिती सभागृहात दु. 12.00 वा. महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुर्नवसन समितीच्या सभापतीपदासाठी  नेमणूक, दु. 12.30 वा. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापती  नेमणूक आणि दु. 01.00 वा.  स्थायी समिती सभापती पदासाठी होणार निवडणूक संपन्न!

Post a Comment

0 Comments