शासन थेट गावात; नागरिकांना दिलासा!
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल तसेच कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे तसेच कल्याण तहसीलदार कार्यालयांच्या वतीने व आमदार किसन कथोरे तसेच जीवनदी महाविद्यालय गवळी यांच्या सहकार्याने म्हारळ सजा यांच्या अंतर्गत गोवेली येथे शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरामध्ये जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, वारसा हक्क प्रमाणपत्र, रहिवासी तसेच आदिवासी व ज्येष्ठ नागरिक दाखले, तसेच सातबारा उतारा, दुय्यम रेशनकार्ड कार्ड, आभा कार्ड, आरोग्य कार्ड, पी एम किसान योजना, दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांचा लाभ शिबिरात देण्यात आला. प्राथमिक स्वरूपात तत्काळ दाखले पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच असंघटित कामगारांना भांडी वाटप करण्यात आली, असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार विकास गारुडकर, नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण, नायब तहसीलदार पंजाबराव पवार, नितीन बोडके, अभिलेख विभागाचे नितीन साळुंखे,सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक रवींद्र भोईर, योगेश धुमाल, किशोर वाडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयश्री सासे, रेश्मा मगर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी, तालुका अध्यक्ष शेखर लोणे,दिव्यांग संघटनेचे भगवान सुरोशी,रवींद्र जाधव, नामदेव टेंभे आदी उपस्थित होते.
यावेळी मंडळ अधिकारी दर्शना भावे, प्रीती घुडे, दीपक गायकवाड, चेतन पष्टे, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालय कर्मचारी, सेवा सेतू केंद्र कल्याण व्यवस्थापक रवी चौधरी व कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले.
यावेळी तहसीलदार विकास गारुडकर यांनी सांगितले की पूर्वी नागरिकांना शासनाकडे जावे लागत होते. परंतु आता शासन आपल्या दारी येत आहे. शासकीय योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे. एकाच छताखाली सर्व योजनांची माहिती होते व त्याचा लाभ मिळतो कोणीही व्यक्ती वंचित राहू नये हा प्रमुख उद्देश आहे. कल्याण तालुका मध्ये एकूण सहा शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत चार शिबिर झाले असून त्या हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आहे.


Post a Comment
0 Comments