पादचारी स्नेही शहर मोहिमेत KDMC ची धडक कारवाई
३२ हातगाड्या, १७ टपऱ्या हटवल्या; पदपथ मोकळे
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ५ (ड), 6 (फ) व 8 (ग) कार्यालयाच्या वतीने दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या व टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. ड प्रभागाच्या पथकामार्फत कैलास नगर, खडेगोळीवली तसेच काटेमानिवली रोड ते पाण्याच्या टाकीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण ३२ हातगाड्या, १७ टपऱ्या आणि ९ लोखंडी स्टॉल हटविण्यात आले. जेसीबीच्या साह्याने ही तोडक कारवाई करण्यात आली असून संपूर्ण कारवाई प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर डोंबिवली पूर्व येथील स्टेशन रोड ते आयकॉन हॉस्पिटल मानपाडा रोड वर दुतर्फा असलेल्या पदपथांवर अनधिकृत टपरी- 14 हातगाड्या- 16
कच्चे शेड- 35 छोटे काउंटर- 07 मोठे काउंटर 05 मोठे व छोटे बॅनर 60 तसेच चिकन दुकानातील साहित्य वजन काटा 02 तसेच प्रिया कलेक्शन या दुकानाचे पॅसेज मधील बांधण्यात आलेले 03 गाळे सील करण्यात आले महापालिकेचे फ प्रभाग सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर व ग प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी त्यांच्या पथकासोबत स्थानिक पोलीस प्रशासन तसेच प्रभागातील सर्व कर्मचारी यांच्यामार्फत तोडक मोहीम राबवली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात पादचारी स्नेही शहर ( pedestrian friendly City) ही विशेष मोहीम प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमे अंतर्गत रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सदर भागात नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा प्रकारच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच इतर विभागामार्फत सुद्धा आयुक्त यांच्या निर्देशनानुसार अशी कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पदपथ व रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.



Post a Comment
0 Comments