गरजू विद्यार्थ्यांना आधार
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
आऊसाहेबांची सावली संस्था, कल्याण अध्यक्ष श्री जितेंद्र अशोक तेलवणे. संस्थेने आजमितीस वडलांचे छत्र नसलेल्या, घरची परिस्थिती बिकट असलेल्या एकूण ७० मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतलेली आहे. एका हुशार गरीब मुलीची इंजिनियरिंगची सुद्धा जबाबदारी संस्थेने घेतली आहे. ठाणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात संस्था कार्यरत आहे.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन, आपल्या आऊसाहेबांची सावली संस्थेने मुरबाड रोड येथील रायते गावातील कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या एका कुटुंबातील कु.शिवम दिपक मिसाळ, (6 वी) व कु.भावेश दिपक मिसाळ (4 थी)ह्या दोन मुलांची पुढील शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून वैचारिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केलेला आहे.आऊसाहेबांची सावलीसंस्थेच्या सर्व सदस्य ह्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा !

Post a Comment
0 Comments