Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण डोंबिवलीमध्ये दिव्यांग क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; महापालिकेचा क्रीडा उपक्रम यशस्वी

महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत दिव्यांग खेळाडूंचा गौरव
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

 दिव्यांग मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांचे पालकांनी त्यांना सर्व स्पर्धांसाठी संधी दयावी असे प्रतिपादन महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी आज केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत स्व.नाना फडके मैदान कल्याण (पश्चिम) येथे समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या क्रिडा स्पर्धाच्या उद्घाटन समयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. स्पर्धेत सहभागी खेळाडुंचे कौतुक करतांना माझ्यासाठी कोणी दिव्यांग नाही तर सर्वजण सर्वसामान्य आणि सक्षम  नागरिक आहेत असे सांगत त्यांनी दिव्यांग बांधवांचा गौरव केला. 

 या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापालिका सचिव किशोर शेळके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच पालिका सदस्य, सदस्या व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्यांगाना सक्षम बनविण्याचा आपला प्रयत्न असून क्रिडा स्पर्धा ही देखील एक थेरेपी आहे, यासाठी पालकांनी मुलांना विविध ॲक्टीव्हिटीमध्ये घालावे. महापालिका अशा उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींना नक्कीच प्रोत्साहन देत राहील असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपले मनोगतात काढले. 

 स्व.नाना फडके मैदानात आज दिव्यांग बांधवांसाठी कॅरम, गोळाफेक, बुध्दीबळ, व्हिलचेअर रेसिंग, नेमबाजी, 100 मी. धावणे (कर्णबधिर आणि मुकबधिर व्यक्तींसाठी), बादलीत चेंडू टाकणे (गतीमंद व्यक्तीसांठी), इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धांमध्ये दिव्यांग बांधवांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून आपल्या कौशल्य व जिद्दीचे दर्शन घडविले. या स्पर्धांच्या आयोजनामुळे दिव्यांग बांधवामध्ये आत्मविश्वास वाढून समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments