अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदाय आयोजित
|| धर्म जागरण महोत्सव||
![]() |
| राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह |
कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या गोवेली येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने येत्या १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदरिल पारायण महामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.ज्ञानेश्वरी पारायण महामहोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे असणार आहेत. सदरिल कार्यक्रमास बालयोगी श्री. सदानंद महाराज तुंगारेश्वर व शांतिब्रध्द श्री. गुरु मारुतीबाबा कुऱ्हेकर यांची प्रमुख उपस्थिती लाबंणारा आहे. सदरिल कार्यक्रमास स्वा. सुखनिवासी श्रीगुरु जोग महाराज, स्वा. सुखनिवासी श्रीगुरु वामनबाबा, स्वा. सुखनिवासी श्रीगुरु सातवाळाराम महाराज, ब्रह्मलिन योगी प.पू. रिद्धीनाथ बाबा, स्वा. सुखनिवासी गु. शंकर महाराज शहाडकर यांचे शुभाशीर्वाद लाभलेले आहेत. सदरिल कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्री. माधव महाराज केशव हे असणार आहेत तसेच प्रेरणा वील प्रमुख मार्गदर्शन रामायणाचार्य ह. भ. प. वें. विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे मार्गदर्शन लाभले जाणार आहे. तसेच मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प. श्री. गुरुवर्य श्री. केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व वारकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
हरिनाम सप्ताह – भक्ती, ज्ञान आणि सामूहिक संस्कृतीचा उत्सव!

Post a Comment
0 Comments