![]() |
| संविधान – स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाची वाट! |
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
आज भारतीय संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यासमयी उपस्थित असलेल्या बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, समाजबांधव व नागरीक यांचेमार्फत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यानंतर दि. 26 नाव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांना व दहशदवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदराजंली वाहुन मौन पाळण्यात आले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, माजी महापौर रमेश जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त रामदास कोकरे, संजय जाधव, प्रसाद बोरकर, सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदे, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त प्रिती गाडे, सविता हिले, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, माजी सहा.आयुक्त अरुण वानखेडे, महापालिका अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव व नागरीक उपस्थित होते.
आजच्या संविधान दिनी विविध कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कल्याण (पश्चिम) येथून निघालेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीत अनेक शालेय विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. आजच्या संविधान दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कडोंमपा बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.), कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे भारतीय संविधानावर व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम इ.चे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments