कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डोंबिवली रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे आयोजित चर्चासत्राला डोंबिवलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील रोटरी भवन येथे आयोजित या अनोख्या उपक्रमाला डोंबिवली परिसरातील 150 हून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने 7 कलमी मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आहे. आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत - यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण ( Rain Water Harvesting), सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश असून त्याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
![]() |
| आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाचे डोंबिवलीकरांकडून विशेष कौतुक! |
“या सात मुद्द्यांवर कल्याण डोंबिवलीतील गृहसंकुलांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज ओळखून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. येत्या काळात कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक लहान मोठ्या निवासी संकुलापर्यंत हा 7 कलमी कार्यक्रम पोहोचवण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस आहे. त्यादृष्टीने कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही डोंबिवली रोटरी क्लब ऑफ ईस्टचे माधव चिकोडी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी शाश्वत आणि सुरक्षित विकास हा कार्यक्रम सोसायटीनिहाय घेऊन सोसायटीनुसार त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
![]() |
| ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे डोंबिवलीत आयोजित चर्चासत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद! |



Post a Comment
0 Comments