Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी श्री.रवींद्र घोडविंदे सर व उपसभापती पदी श्री जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड!

 

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी

 कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापती पदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक झाली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजपाने शिक्कामोर्तब करीत बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकवला.

   कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या जागांसाठी गेल्या एक दीड आठवडा भरा पूर्वी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एक हाथी सत्ता काबीज करीत सर्वाधिक सोळा जागा पटकावल्याने महायुतीचा बाजार समितीवर झेंडा फडकाविला. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचे दाखवून देत शेतकरी पत संस्था व ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व दाखवून दिले.

निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्फत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदा साठी रवींद्र  घोडविंदे व उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सभापती रवींद्र घोडविंडे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली असून भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचे खंदे असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार कथोरे हे देखील  उपस्थित राहिले होते. उपसभापती जालिंदर पाटील हे या पूर्वी दोन टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आले होते व नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून  आले आहेत.


यावेळी बोलताना सभापती घोडविंडे यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने संचालक मंडळातील सर्व पक्षातील सदस्यांना एकत्रित घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जाणार असल्याचे सांगितले तसेच बाजार समितीच्या आवारातील फुल, भाजी मार्केट मधील  साठलेला कचऱ्याचा ढीग रस्त्यावर जागोजागी पडलेला दिसत असल्याने या साचल्या जाणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस प्रकिया प्रकल्प राबवून त्या पासून खत निर्मितीचा प्रकल्प येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे. तसेच बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत विकासाला प्राधान्य देऊन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने काम करावे. या बाजार समितीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. 
आमदार किसन कथोर.
कल्याण बाजार समितीवर एकहाती सत्ता महायुतीची आहे. सभापती, उपसभापती व संचालक मंडळ एक जुटीने काम करेल त्यांना महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मदत करतील.
गोपाळ लांडगे शिवसेना
कल्याण बाजार समितीच्या मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या विकासासाठी पदाधिकारी व संचालक काम करतील. त्यांच्यावर आमचा अंकुश असेल. 
प्रमोद हिंदूराव... राष्ट्रवादी काँग्रेस


Post a Comment

0 Comments