Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत वारसदारांना नियुक्ती पत्र प्रदान.


कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी

लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय‍, परिपत्रक व शासन पत्रातील नमूद तरतूदीच्या अनुषंगाने महापालिकेच्या सफाई कामगार या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी हे सेवानिवृत्त/स्वेच्छासेवानिवृत्त/मयत/वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांनी सादर केलेली कागदपत्रे आणि शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून, या वारसदारांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने नियुक्ती देणेबाबत पात्र ठरविण्यात आले आहे.

वैद्यकीय दृष्ट्या पात्र व चारित्र्य आणि पुर्व चारित्र्य पडताळणी अंती पात्र ठरलेल्या एकुण 114 वारसदारांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार त्यांना आज महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यामध्ये 1 भुमापक, 24 लिपिक, 34 शिपाई, 55 सफाई कामगार या पदांवर एकुण 114 वारसदारांना नियुक्तीचे आदेश वितरित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments