Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण-डोंबिवलीत १० प्रभागांच्या सभापतीपदासाठी रंगणार राजकीय सामना; १८ दावेदार सज्ज!

भाजप, शिवसेना, मनसेसह विविध पक्षांकडून उमेदवारी; २१ ऑक्टोबरला होणार सभापतीपदाची निवड

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 1/अ, 2/ब, 3/क, 4/जे, 5/ड, 6/फ, 7/ह, 8/ग, 9/आय व 10/ई प्रभाग क्षेत्र समितींच्या सभापती पदाची निवडणूक दि.21 ऑक्टोबर 2026 रोजी संपन्न होणार असून, या 10 प्रभाग समितीच्या सदस्यांपैकी एका सदस्याची सभापती पदी निवड करणेकामी आज सकाळी 11.30 ते सायं. 05.30 या कालावधीत महापालिका सचिव यांचेकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली. यामध्ये 1/अ प्रभागासाठी शिवसेनेचे बंदेश नारायण जाधव, 2/ब प्रभागासाठी शिवसेनेच्या सुप्रिया प्रभुनाथ भोईर आणि शिवसेना (उबाठा )पक्षाच्या स्वप्नाली विनोद केणे, 3/क प्रभागासाठी भाजपाच्या मेघाली सचिन खेमा व शिवसेनेचे प्रतिक प्रकाश पेणकर, नॅशनलिस्ट कॉग्रेस पक्षाचे रमिज मनियार, 4/जे प्रभागासाठी शिवसेनेच्या दर्शना समिप काळे, 5/ड प्रभागासाठी मनसेच्या शितल महेश मंढारी, 6/फ प्रभागासाठी भाजपाच्या मंदा सुभाष पाटील,7/ह प्रभागासाठी भाजपाच्या रविना राहुल म्हात्रे, मनसेचे संदेश हरिश्चंद्र पाटील, शिवसेनेच्या रेखा जनार्दन म्हात्रे, 8/ग प्रभागासाठी भाजपाच्या कविता मिलींद म्हात्रे, शिवसेनेचे सुरज राजन मराठे, 9/आय प्रभागासाठी भाजपाच्या सरोज मनोज राय व शिवसेना(उबाठा ) पक्षाचे निलेश अशोक खंबायत, 10/ई प्रभागासाठी भाजपाच्या रविना अमर माळी आणि शिवसेनेचे अर्जुन बाबु पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केले. आज एकुण 18 अर्ज, 10 प्रभाग समिती सभापती पदासाठी सादर करण्यात आले आहेत. शिवसेनेतर्फे अर्ज भरतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, महापालिका महापौर हर्षाली चौधरी, आणि भाजपा तर्फे अर्ज भरतेवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, महापालिकेचे इतर पदाधिकारी, पालिका सदस्य /सदस्या उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments