8 प्रभागांत सभापती बिनविरोध; 2 प्रभागांत झालेल्या मतदानात शिवसेना व भाजपाचा विजय
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 1/अ, 2/ब, 3/क, 4/जे, 5/ड, 6/फ, 7/ह, 8/ग, 9/आय व 10/ई या 10 प्रभाग क्षेत्र समितीच्या सभापती पदासाठी आज पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी (ठाणे) डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रभागनिहाय खालीलप्रमाणे पालिका सदस्य/सदस्या प्रभाग समिती सभापती पदी निवडणूक आले आहेत.
1/अ प्रभाग क्षेत्र – बंदेश नारायण जाधव – शिवसेना, 2/ब प्रभाग क्षेत्र - सुप्रिया प्रभुनाथ भोईर – शिवसेना, 3/क प्रभाग क्षेत्र – मेघाली सचिन खेमा - भाजपा, 4/जे प्रभाग क्षेत्र – दर्शना समिप काळे - शिवसेना, 5/ड प्रभाग क्षेत्र – शीतल महेश मंडारी - मनसे, 6/फ प्रभाग क्षेत्र – मंदा सुभाष पाटील – भाजपा, 7/ह प्रभाग क्षेत्र – डॉ.रविना राहुल म्हात्रे - भाजपा, 8/ग प्रभाग क्षेत्र – सुरज राजन मराठे - शिवसेना,9/आय प्रभाग क्षेत्र – सरोज मनोज राय – भाजपा, 10/ई प्रभाग क्षेत्र – अर्जुन बाबु पाटील – शिवसेना.
यामध्ये खालील पालिका सदस्य/सदस्यांचा संबंधित प्रभाग क्षेत्रासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे आणि तो वैध ठरल्यामुळे ते प्रभाग क्षेत्र सभापती पदी बिनविरोध निवडून आले.
1/अ प्रभाग - बंदेश नारायण जाधव – शिवसेना, 4/जे प्रभाग- दर्शना समिप काळे-शिवसेना, 5/ड प्रभाग- शीतल महेश मंडारी-मनसे, 6/फ प्रभाग- मंदा सुभाष पाटील-भाजपा
या निवडणूक प्रक्रियेत 3/क प्रभागात शिवसेनेचे प्रतिक प्रकाश पेणकर आणि एनसीपी चे रमिज मो. रफिक मणियार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, भाजपाच्या मेघाली सचिन खेमा बिनविरोध निवडून आल्या. 7/ह प्रभागात मनसेचे संदेश हरिश्चंद्र पाटील आणि शिवसेनेच्या रेखा जनार्दन म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, भाजपाच्या डॉ.रविना राहुल म्हात्रे बिनविरोध निवडून आल्या. 8/ग प्रभागात भाजपाच्या ॲड.कविता मिलींद म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, शिवसेनेचे सुरज राजन मराठे बिनविरोध निवडून आले. तर 10/ई प्रभागात भाजपाच्या रविना अमर माळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, शिवसेनेचे अर्जुन बाबू पाटील बिनविरोध निवडून आले. उर्वरित निवडणूक प्रक्रियेत 2/ब प्रभागात शिवसेना उबाठाच्या स्वप्नाली विनोद केणे यांना 4 मते आणि शिवसेनेच्या सुप्रिया प्रभुनाथ भोईर यांना 8 मते प्राप्त झाल्यामुळे, शिवसेनेच्या सुप्रिया प्रभुनाथ भोईर या 2/ब प्रभाग क्षेत्र समिती सभापती पदी निवडून आल्या. तसेच 9/आय प्रभागात शिवसेना उबाठाचे निलेश अशोक खंबायत यांना 2 मते आणि भाजपाच्या सरोज मनोज राय यांना 8 मते प्राप्त झाल्यामुळे, भाजपाच्या सरोज मनोज राय या 9/आय प्रभाग क्षेत्र समिती सभापती पदी निवडून आल्या.


Post a Comment
0 Comments