आउटलेट मॉल ऑफ इंडिया' सर्वांसाठी खुला; वर्षभर ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सूट
भारतातील सर्वात मोठे आउटलेट शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणारा 'आउटलेट मॉल ऑफ इंडिया' आता अधिकृतपणे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. ग्राहकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सवर वर्षभर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्याची सुविधा या मॉलमध्ये उपलब्ध होणार असून, त्यामुळे परिसरातील ग्राहकांसाठी खरेदीचा एक नवा पर्याय निर्माण झाला आहे. भुमी वर्ल्ड परिसरात उभारण्यात आलेल्या या मॉलमध्ये फॅशन, फुटवेअर, स्पोर्ट्सवेअर, अॅक्सेसरीज, लगेज, घड्याळे, ज्वेलरी आणि लाइफस्टाइल अशा विविध श्रेणींतील अनेक नामांकित ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत. स्केचर्स, टॉमी हिलफिगर, कॅल्विन क्लाइन, लेव्हीज, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन, रेअर रॅबिट, लॅकोस्ट, हश पपीज, जिओर्डानो, फॉरएव्हर न्यू, हायडिझाइन, GIVA, स्पायकर, टेक्नोस्पोर्ट, जॉकी, द सोल्ड स्टोअर, बाटा, क्रॉक्स, अमेरिकन टुरिस्टर, सफारी, मुफ्ती, ASICS, KWC वॉचेस आदी अनेक लोकप्रिय ब्रँड्सची उत्पादने येथे ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
आउटलेट मॉलची संकल्पना ग्राहकांना वर्षभर सवलतीच्या दरात दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आधारित आहे. पारंपरिक सेलची वाट न पाहता, कोणत्याही वेळी आकर्षक किमतीत खरेदी करण्याची संधी या मॉलद्वारे उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रीमियम ब्रँड्सची उत्पादने अधिक परवडणाऱ्या दरात ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. मॉलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, बदलत्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन मूल्य, विविधता आणि उत्कृष्ट खरेदीचा अनुभव या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. वर्षभर आकर्षक सवलतींसह ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंग अनुभव देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आउटलेट मॉल ऑफ इंडिया सुरू झाल्यामुळे कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई तसेच आसपासच्या परिसरातील ग्राहकांना प्रीमियम ब्रँड्सची खरेदी सवलतीच्या दरात करण्यासाठी नवीन आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाला आहे.

Post a Comment
0 Comments