Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

शिक्षणासाठी पत्रकार संघाचा सामाजिक संकल्प;शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती   आणि कोकण पत्रकार संघ यांच्या   संयुक्त  विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना   शालेय साहित्याचे वाटप 
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण तालुक्यातील रायते, नडगाव व खाकरवाडी बेलपाडा येथे शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती, आणि कोकण विभागीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २ जुलै रोजी गरीब होत करू आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना 'शालेय साहित्य वाटप करण्यात आले. खाकरवाडी येथील आदिवासी महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले. रायते, नडगाव- खाकरखाडी आणि बेलपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल कंपास पेटी तसेच इतर शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरूपानंद स्वामी म्हणाले गोरगरिबांना मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे गोरगरीब होतकरू आदिवासी मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे शिक्षणातून आपली प्रगती करून घ्यावी असे शिवरूपानंद स्वामिनी मार्गदर्शन केले. 

कोकण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे म्हणाले शिक्षण हे प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे आदिवासी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून अभ्यासात प्रगती केली पाहिजे शिक्षण घेऊन आपली व आपल्या समाजाची प्रगती करावी उन्नती करावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल समाजसेवक पत्रकार सुदाम पाटील आणि नारायण सुरोशे यांचे अभिनंदन केले तसेच स्वामींनी विद्यार्थ्यांना भरीव मदत केल्याबद्दल स्वामींचे आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे आणि कल्याण उपविभागीय अधिकारी प्रांत म्हस्के पाटील हे महत्त्वाची मीटिंग असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी फोन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार सुदाम पाटील, कोकण विभागीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे, कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष संदीप शेंडगे, रायते ग्राम पंचायतचे सरपंच समिता संतोष सुरेशी, नरेश सुरोशी कल्याण बाजार समिती संचालक, सरपंच अरुणा चौधरी, सतीश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा 'महाराष्ट्र क्रांती'चे संपादक नारायण सुरोशी आणि पत्रकार तानाजी लोणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम पुढील काळातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments