Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

पक्षांतर केलेल्या खासदारांविरोधात शिवसैनिकांचा जनआक्रोश;गोवेली नाक्यावर शिवसेना (उबाठा)चे आंदोलन

लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार; गोवेली आंदोलनातून शिवसेना (उबाठा)चा इशारा

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण ग्रामीण, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण पश्चिम विभागाच्या वतीने आज कल्याण तालुक्यातील टिटवाळा गोवेली नाका येथे खासदारांच्या भूमिकेच्या निषेधार्थ जनआक्रोश व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. अल्पेश भोईर यांनी केले. या वेळी आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. "जय भवानी, जय शिवाजी", "बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" तसेच पक्षसमर्थक घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनामुळे काही काळ कल्याण-मुरबाड महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान ॲड. अल्पेश भोईर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस चौकीत नेले. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरूच राहिले. काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.

या आंदोलनावेळी यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख ॲड अल्पेश भोईर यांनी संबंधित खासदारांनी आपल्या भूमिकेबाबत जनतेची माफी मागावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच पक्षाच्या विचारांशी निष्ठावान राहून भविष्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनाला शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शहरप्रमुख बाळा परब, जिल्हा संघटक संतोष सुरोशी, उपजिल्हाप्रमुख कृष्णा धुमाळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा कंठे, महिला संघटक मिनल कांबळे, सुनीता लेखावले, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, नगरसेविका तेजश्री गायकवाड, नगरसेवक राहुल कोट, संकेश भोईर, विशाल गारवे, माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी, दशरथ तरे, राम तरे, लक्ष्मण तरे, सुरेश सोनार, विजय कोट, शत्रुघ्न तरे, संतोष विशे, गुरुनाथ भावार्थे, कल्याण नरेश सुरोशी, भास्कर टेंभे, रमेश बांगर, सुदाम भोईर, हरिभाऊ शेलार, प्रभाकर भोईर, किशोर पाटील, मधुरा परदेशी, सुवर्णा पवार, अश्विनी नारकर, ज्योती, राजलक्ष्मी अंगारके यांच्यासह विविध पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments