Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

मुंबई उच्च न्यायालयात डावकर कंपनीविरोधातील याचिका फेटाळली


कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 
कल्याणमधील सुप्रसिद्ध बांधकाम कंपनी डावकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. विरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका क्र. ७३/२०२३ ही पहिल्याच सुनावणीत फेटाळ ठरल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याकडून आरोपांना समर्थन देणारे ठोस पुरावे किंवा कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने कंपनीचे दावे ग्राह्य धरल्याचे कंपनीचे संचालक संतोष डावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राजेंद्र नाथ पारसनाथ पांडे आणि सुजित अनंत कदम यांनी कंपनीने नोंदलेल्या जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत, असे संचालक डावकर यांनी स्पष्ट केले. कंपनीने बांधलेल्या इमारती कोणत्याही सरकारी संस्थेच्या जमिनीवर नसून त्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवरच उभारण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित जमीन सुमारे १८ वर्ष जुनी शेतीची जमीन असून सर्व बांधकामे नियमांनुसार करण्यात आली आहेत. आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करून कर व शुल्कही भरले असल्याचा दावा त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments