पत्रकारांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी प्रेस क्लब कल्याणचा पुढाकार!
पत्रकार बांधव बातमी मिळविण्यासाठी दिवसभर खूप धडपड करीत असतात पण ते स्वतःची काळजी कधीच घेत नाही त्यातच आजच्या डिजिटल युगात सतत मोबाईलवर काम करत राहणे त्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येत आहे डोळ्यांवर येणारा ताण प्रत्येक जण दुर्लक्षित करीत आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी व डोळ्यांची निगा राखणे महत्वाचे असून याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व यासाठी काय करावे लागेल याबाबतची विस्तृतपणे माहिती ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेच्या वरिष्ठ रेटिना शल्यचिकित्सक डॉ पुष्पांजली रामटेके यांनी प्रेस क्लब कल्याण आयोजित वार्तालाप सोहळ्या प्रसंगी दिली.
कल्याण डोंबिवली शहर परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारांसाठी कार्ये करणारी ठाणे जिल्ह्यातील पहिली रजिस्ट्रर संस्था आहे प्रेस क्लब कल्याण ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्त पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांची निगा राखण्यासाठी कल्याण खडकपाडा येथील ईशा नेत्रालयाचा वार्तालाप सोहळा पार पडला यावेळी डॉ पुष्पांजली रामटेके , बाल नेत्र तज्ञ डॉ स्नेहा पेशवाणी प्रेस क्लब चे अध्यक्ष आनंद मोरे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव विष्णूकुमार चौधरी आदी सह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते याप्रसंगी पत्रकारांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, रोज मोबाईलवर किती काम करावे, झोप किती घ्यावी, आराम कसा करावा अशा अनेक बाबींचा ऊहापोह डॉ पुष्पांजली रामटेके यांनी केला. बाल नेत्र व स्वीवंट तज्ञ डॉ स्नेहा पेशवाणी यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आधी पासूनच कशी करावी याबाबत अनेक उदाहरण देत मार्गदर्शन केले डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया महागडी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका डोळे आहेत तर आपण जग बघू शकू व बातम्या करू शकतो त्यामुळे आपल्या डोळ्यांची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रेस क्लब चे ज्येष्ठ सदस्य दत्ता भाटे यांनी केले तर कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची वेळेवर तपासणी करा असे यावेळी सांगितले वार्तालाप सोहळ्या प्रसंगी ईशा नेत्रालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांची मोफत तपासणीचे फॅमिली कार्ड आणि आय मास्क देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवर डॉक्टरानी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व शंकाचे निरसन केले या वार्तालापा प्रसंगी ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेचे विस्तार अधिकारी गौरव कांबळे, शाखा अधिकारी राजश्री वाघ, विशाखा शहा आदी मान्यवरांचे जेष्ठ सदस्य नवीनभाई भानुशाली, अतुल फडके, सचिन सागरे, राजेश जाधव, रवि चौधरी यांनी स्वागत केले या वार्तालापाला ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य, आर टी सुरळकर ,नाना म्हात्रे, दिलीप पाटणकर, रविंद्र खरात, संतोष होळकर,केतन बेटावदकर, आकाश गायकवाड, चारुशीला पाटील, राजू काऊतकर, सिद्धार्थ कांबळे, नारायण सुरोशी , संभाजी मोरे आदी सह विविध दैनिकाचे आणि वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर दत्ता भाटे यांनी आभार व्यक्त केले.



Post a Comment
0 Comments