"वंदे मातरम्” च्या सुरांनी दुमदुमले महानगरपालिका भवन! 🇮🇳
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशानुसार, “वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सामूहिक वंदे मातरम् गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपआयुक्त (माहिती व जनसंपर्क) श्रीमती वंदना गुळवे, तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन “वंदे मातरम्” चे सामूहिक गायन करून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, “‘वंदे मातरम्’ या गीतातील प्रत्येक शब्द भारत माता विषयी असलेल्या समर्पण, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूती देतो. हे गीत आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि देशभक्तीच्या भावनेचे प्रतीक आहे.”तसेच त्यांनी शिक्षण विभागाला सुद्धा सूचित केले आहे की, “वंदे मातरम्” गीताचा इतिहास, अर्थ आणि त्यामागील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांमध्ये विशेष उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांच्या “जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.



Post a Comment
0 Comments