Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

‘दृष्टी दिना’चे औचित्य साधून अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सुंदर उपक्रम

सांस्कृतिक कार्यक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ९ ऑक्टोबर  दृष्टी दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उपायुक्त, कांचन गायकवाड यांचे हस्ते झाले.

सदर कार्यक्रमात अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रम राबविण्यात आले 

•विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक सोप्या पद्धतीने कसा करावा याविषयी मार्गदर्शन.

•परीक्षेची तयारी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सल्ला व प्रेरणा सत्र.

•सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व शैक्षणिक साहित्यांचे वितरण.

•विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती आणि प्रतिभेचेसादरीकरण.

या कार्यक्रमाचा उद्देश अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे सर्व संबंधित शाळा, संस्था आणि पालकांना या उपक्रमात सहभागी करण्यात आले.आज या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे उपायुक्त कांचन  गायकवाड समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, क्रीडा अधिकारी प्रविण कांबळे,वृंदा दुर्वे,संपदा पळणीटकर उपस्थित होते.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments