Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला अभूतपूर्व प्रतिसाद.इंडिया बुक ऑफ रेकॉड्स आणि OMG बुक ऑफ रेकॉड्स यांनी घेतली या कार्यशाळेची दखल !.

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस अभूतपूर्व प्रतिसाद !इंडिया बुक ऑफ रेकॉड्स आणि OMG बुक ऑफ रेकॉड्स यांनी घेतली या कार्यशाळेची दखल !

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरण पुरक म्हणजेच शाडु मातीच्या श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनमानसामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत कै.ह.भ.प.सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त सभागृहात आज दि.12/08/2025, अंगारक चतुर्थीच्या दिवशी कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील महापालिकेच्या शाळा, खाजगी शाळा, विनाअनुदानीत शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडु मातीच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस शालेय विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून, अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सकाळी 08.00 पासूनच डोंबिवलीतील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त सभागृह चिमुकल्या मुलांच्या किलबिलाटाने भरुन गेले होते. तन्मयतेने आणि आपले भान हरपून शाडु मातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती साकारणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला मा.आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी देखील मनापासून दाद दिली.पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा व्हावा, जास्तीत जास्त नागरीकांनी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती स्थापनेची भावना रुजवावी, म्हणून *"हरित बाप्पा, फलित बाप्पा"* या संकल्पनेवर आज या कार्यशाळेचे आयोजन आज केले असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त अभिनव गोयल यांनी दिली.या कार्यशाळेमध्ये क्षितीज गतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ठ श्री गणेश मूर्ती आपल्या हातानी साकारल्या.

यापूर्वी बंगलोर येथील पोल्यूशन कंट्रोल बोर्ड यांचा एकुण 3,308 पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनविण्याचा जागतिक विक्रम महापालिकेच्या आजच्या या कार्यशाळेत मोडीत निघाला असून, आजच्या या कार्यशाळेत एकुण 4,657 विद्यार्थ्यांनी श्री गणेश मूर्ती साकारल्याने याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉड्स आणि OMG बुक ऑफ रेकॉड्स या बुकमध्ये घेतली असल्याचे इंडिया बुक ऑफ रेकॉड्सच्या सीमा मानीक्कोथ OMG बुक ऑफ रेकॉड्सचे डॉ.दिनेश गुप्ता यांनी घोषीत केल्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.ही कार्यशाळा सकाळी 08.30 ते दुपारी 01.00 या वेळेत संपन्न झाली.

सहभागी विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि शाळांचे शिक्षक मिळून एकुण 5245 जणांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. याचीही दखल OMG बुक ऑफ रेकॉड्स यांनी घेवून घोषीत केल्याची माहिती या कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख आणि पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रोहिणी लोकरे यांनी दिली.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, समिर भुमकर, वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा.आयुक्त प्रिती गाडे, हेमा मुंबरकर, राजेश सावंत यांनी उपस्थित राहून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. तसेच मूर्तीकार सचिन गोडांबे, मिनल लेले, शेखर ईश्वाद, संतोष जांभुळकर, गुणेश अडवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता पर्यावरण प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व त्यांच्या विभागातील सहकारी तसेच एज्युकेशन टुडे फांऊडेशनचे भरत मलिक व वृंदा भुस्कुटे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments