![]() |
| कल्याण मुरबाड रोड रायते येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पर्स मधील पैसे आणि मौल्यवान वस्तू केल्या परत. |
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
रायता -बिर्लागेट रिक्षा स्टॅडचे सदस्य (चालक ) श्रीकांत सु.तारमळे राहणार मु.रायते यांना रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रात्री ८ वाजता एक महिला रिक्षा मध्ये प्रवाश करीत असताना तिच्या सोबत ९ महिन्याच लहान लेकुर असल्यामुळे घाई -गडबरीने रिक्षाचा भाडा देऊन निघुन गेल्या जेव्हा रिक्षा चालक दुसरा भाडा भरत असताना त्यांच्या निदर्शनास आले की रिक्षाच्या मागच्या शिटवर कोणी तरी फर्स विसरून गेली आहे,पर्स उघडून बघितली तर त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू आणि पाच हजार दोनशे रुपये आढळले, तसेच त्यांना त्या मध्ये ओळखपत्र किंवा पत्ता सापडला नाही शेवटी त्यांनी मित्रांच्या सहकार्याने ही पर्स जवळच्या उल्हासनगर नं.१ पोलीस स्टेशनचे वाहतुक पोलीस हवालदार गणेश शेलार यांच्याकडे जमा केली त्यांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता सौं.कविता शिंदे,राहणार उल्हासनगर ४ या महिला पर्स विसरून गेल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनात आले त्यांनी लगेच या महिला व प्रामाणिक रिक्षा चालक सामाजिक कार्यकर्ते श्री.श्रीकांत तारमले यांना बोलावून हवालदार गणेश शेलार यांनी महिलेस त्यांच्या वस्तू व रक्कम परत दिल्या आणि ती व्यक्ती 1000 रुपये बक्षीस म्हणून देत होत्या मी त्यांना नको म्हणालो पोलिसांन कडून प्रमाणिक रिक्षावाला म्हणून कौतुक करण्यात आला.

Post a Comment
0 Comments