![]() |
| श्रीराम कॉलनी परिसरात ही विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. |
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या विकासनिधीतून कल्याण पश्चिमेतील सह्याद्री नगर आणि बिर्ला कॉलेज परिसरात गटार आणि पायवाटसारख्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील साहेब यांनी अथक प्रयत्न केले असून येथील श्रीराम कॉलनी परिसरात ही विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर साहेब आणि शहरप्रमुख रवी पाटील साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत.
याप्रसंगी महिला जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे, युवासेना उपशहर प्रमुख अनिरुध्द पाटील, महिला उपशहर संघटक सौ.अंजलीताई भोईर, विभाग प्रमुख संजय राजपूत, उपविभाग प्रमुख अजय हिरवे, दिपक धनावडे, युवासेना जिल्हा सचिव योगेश पाटील, युवासेना कल्याण शहर समन्वयक राम मुसळे, शाखा संघटक सौ.सुचिताताई मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....


Post a Comment
0 Comments