Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण-डोंबिवलीत सुका कचरा संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात ५ टन कचरा संकलित🌍♻️🚮

रोटरी क्लबकडून १५२ किलो ई-वेस्ट संकलन; नागरिकांना दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर एडवोकेट हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन विभागाने शाश्वत शून्य कचरा मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत प्रत्येक महिन्याचा " पहिला रविवार -सुका कचरा "ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील २५ ठिकाणी सुक्या कचऱ्यातील पुनर्वापरायोग्य घटक स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी, विशेष कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या या संकलन केंद्रावर राबविण्यात येणाऱ्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून आज सकाळच्या प्रहरात रोटरी भवन, डोंबिवली येथे रोटरी क्लबच्या वतीने 152 किलोग्रॅम e-वेस्ट संकलित करण्यात आले आहे. याशिवाय ऊर्जा फाऊडेशन,टिळकनगर गणेशोत्सव मंडळ,निर्मल फाऊंडेशन,रिजन्सी वुमन्स क्लब यांनी देखील विविध केंद्रावर सुका कचरा संकलनासाठी समन्वय साधला.आजच्या मोहिमेत प्लास्टिक,कपडे,कागद,इ वेस्ट,काच,थर्माकोल,फर्निचर इत्यादी साहित्य जवळपास 5 टन संकलित करण्यात आले. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे, सुका कचरा वेगळा केल्याने त्याच्या पुनर्वापरास चालना मिळते आणि प्रदूषणाचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आपले शहर अधिकाधिक सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर न टाकता महापालिकेच्या घंटागाडीतच द्यावा आणि महापालिकेच्या दर महिन्याच्या पहिल्या रविवारी असलेल्या सुका कचरा संकलन मोहिमेस प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments