कोकण विभाग पत्रकार संघाची ठाणे जिल्हा (शहर) कार्यकारिणी उत्साहपूर्ण वातावरणात जाहीर करण्यात आली असून, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटन अधिक मजबूत करणे आणि पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण व्हावी या एकमेव उद्देशाने कोकण विभागीय पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी तसेच शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सोमवारी कल्याण येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विविध शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील होते. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख तसेच पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सांबरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. ठाणे जिल्हा मुख्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संपादक विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी महादेव पंजाबी, सचिवपदी आनंद पद्मनाभन व प्रफुल केदारे यांची निवड करण्यात आली तर सह - सचिवपदी करण शर्मा, तर कोषाध्यक्षपदी गोपाल शर्मा यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मीनल पवार, हरिप्रकाश तिवारी आणि दीपक इंगळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कल्याण शहर कार्यकारिणीमध्ये संदीप शेंडगे यांची कल्याण शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली तर, शरद शहाणे यांची डोंबिवली शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सारिका शिंदे यांची डोंबिवली महिला विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर विद्या कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी रामचंद्र खडपे यांची नवी मुंबई शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. कल्याण शहर कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी मच्छिंद्र कांबळे, सचिव पदी जितेंद्र कानडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी संभाजी आत्माराम मोरे, अजय शेलार, सुधीर लवांदे आणि नारायण सुरोशे सहखजिनदारपदी सचिन कानडे, सहसंघटकपदी राहुल उघडे, संघटकपदी दिनेश जयस्वाल व तानाजी लोणे, सहसचिवपदी संजय भोराडे तर सदस्य म्हणून सुभाष शेंडगे, विनोद लोखंडे, साईनाथ ठाकरे आणि भगवान सुरळके रितेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांनी पत्रकारांची एकजूट, पत्रकारितेतील प्रामाणिकपणा आणि संघटनात्मक बळ यांचे महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांच्या हक्कांसाठी सक्षम व प्रभावी संघटना उभी करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांनी मोफत माहिती अधिकार प्रशिक्षण आधुनिक पत्रकारितेतील नवीन तंत्रज्ञान व नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येईल तसेच पत्रकार नेहमी हा अपडेट राहिला पाहिजे पत्रकार हा अधिक सक्षम झाला पाहिजे याकरिता संघटनात्मक प्रयत्न करणार असल्याचे हंडोरे यांनी सांगितले. कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख तसेच पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सांबरे यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप, माध्यमविश्वातील संधी, व्यावसायिक नैतिकता आणि संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर उपस्थित पत्रकारांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीमुळे कोकण विभाग पत्रकार संघाच्या कार्याला नवी दिशा मिळून पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments