विद्यार्थ्यांसाठी २५ दिवसांचे विशेष योग प्रशिक्षण शिबिर सुरू
![]() |
| शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग आवश्यक – आमदार किसन कथोरे |
जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय , आरोग्य योगा अँड नॅचरोपॅथी, जीवन फाउंडेशन व डॉक्टर विजय कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली २५ दिवसीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी मुरबाड विधानसभा आमदार मा. श्री किसन कथोरे, मा. श्री जीवन विचारे (एसएसटी महाविद्यालय उल्हासनगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिल्हा समन्वयक) ह. भ. प. कैलास महाराज नचिते, अनिल घरत, जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे सौ. स्मिता घोडविंदे ,राजू मगर ,संजय शेलार, राजेंद्र जाधव, श्री. प्रशांत घोडविंदे, श्री नरेंद्र पाटील ,जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य. श्री प्रकाश रोहणे व निर्मल इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका भावना कुंभार ,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे प्रा. डॉ. संदेश जायभाय, नीरज मिश्रा, राजू रूपवते (विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना) व योगा शिक्षक उपस्थित होते शरीराला स्वास्थ्य व मनाला शांतता देण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे सर्वोत्परी महत्त्व डॉक्टर विजय कुकरेजा यांनी विद्यार्थी प्राध्यापक व उपस्थित मान्यवर मंडळींना समजावून सांगितले. या योग महोत्सवाचा डिजिटल स्क्रीनवर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. माननीय आमदार यांनी देखील सर्वांना योगा बाबत योग्य मार्गदर्शन केले. या योग प्रशिक्षणाचा पाया जीवनदीप महाविद्यालयात आज रोवला गेला महाविद्यालयात योगा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश लकडे प्रा. नरेश टेंभे, योग शिक्षिका स्नेहल पाटील यांनी केले; तर संपूर्ण सभागृह मंत्र करण्याचे काम निर्मल इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी व संगीत शिक्षक गणेश केमारे यांनी केले. कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी (एन एस एस) (एन सी सी) यांचे स्वयंसेवक व कॅंडिडेट यांनी विशेष सहकार्य केले महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभाग व सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments