Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

अंगणवाडी ते शाळा प्रवास सुलभ करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम यशस्वी

लहानग्यांसाठी मोठा उपक्रम; मेळावा-१ पार
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी उपक्रमांतर्गत आज  महानगरपालिकेच्या ५९ शाळांमध्ये ‘शाळा पूर्वतयारी मेळावा-१’ उत्साहात पार पडला. अंगणवाडी ते शाळा हा बालकांचा प्रवास अधिक सुकर व सुलभ व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास मुख्याध्यापक, शिक्षक, माता-पालक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. बालकांच्या शिक्षणाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न निश्चितच मोलाचा ठरणार आहे.

सदर मेळाव्यादरम्यान शासनाच्या नियमानुसार बालकांच्या महत्त्वपूर्ण स्तर क्षमतेचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणा व समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन उपक्रमाचे निरीक्षण केले. प्रशासन अधिकारी  भारत बोरनारे यांनी सांगितले की, पुढील ‘मेळावा-२’ पर्यंतच्या ६ ते ७ आठवड्यांच्या कालावधीत बालकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचे पहिले पाऊल शाळेत ठामपणे पडावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी  विजय सरकटे यांनी प्रभावी नियोजन केले होते. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments