Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

संजय गांधी योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ

शहरी व ग्रामीण भागातील विधवा, दिव्यांग व वयोवृद्धांना शासकीय योजनांचा लाभ
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 
 टिटवाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शासकीय लाभार्थी शिबिरात शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमास प्रशासनातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी उपविभागीय अधिकारी श्री विश्वास गुजर, तहसीलदार विकास गारुडकर, निवासी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, नायब तहसीलदार (महसूल) श्री पंजाबराव पवार, नितीन बोडके (नायब तहसीलदार – संजय गांधी योजना, कल्याण) तसेच पुरवठा अधिकारी वृषाली मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण भागातील विधवा महिला, दिव्यांग नागरिक, वयोवृद्ध तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते. उपस्थित लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आला.
याशिवाय लाभार्थ्यांसाठी विविध शासकीय विभागांमार्फत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका संबंधी कामे, वैद्यकीय पथकाद्वारे लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, तसेच भूमिअभिलेख विभागामार्फत आवश्यक कागदपत्रे व कामे मार्गी लावण्यात आली.
या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments