नवनिर्वाचित महापौर हर्षाली विजय चौधरी व उपमहापौर राहुल दामले यांची अधिकृत घोषणा
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
नागरीकांनी दर्शविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी आज केले. महापालिका सभागृहात पीठासीन अधिकारी आंचल गोयल (मा.जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी दाखल झालेल्या वैध नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने हर्षाली विजय चौधरी यांस महापौर म्हणून आणि राहुल वसंत दामले यांस उप महापौर म्हणून पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले. जनतेची कामे व्यवस्थित होणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांची साथ असावी परंतु नागरीकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, माझ्या वरील जबाबदारीचे सोनं करेन अशा शब्दात महापौर हर्षाली चौधरी यांनी उपस्थितांना आश्वासित केले.एकमेकांच्या हातात हात घालून समन्वयाने कल्याण डोंबिवलीला पुढे नेऊया असेही उद्गार नवनिर्वाचित उपमहापौर राहुल दामले यांनी यावेळी बोलतांना काढले.मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच सभागृहातील उपस्थित पालिका
सदस्यांनी नवनिर्वाचित महापौर व उप महापौरांचे अभिनंदन केले. यासमयी मा.आमदार सुलभाताई गायकवाड, मा. आमदार राजेश
मोरे, मा.माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख
गोपाळ लांडगे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments