Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

महायुतीकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर; नामनिर्देशन अर्ज सादर

कल्याण-डोंबिवलीत महापौर निवडीची रणधुमाळी सुरू
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर व उप महापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज आज दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका सचिव किशोर शेळके यांनी दिली आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मनसे महायुतीतर्फे आज महापौर पदासाठी शिवसेनेच्या हर्षाली थवील चौधरी यांनी  आपला नामनिर्देशन अर्ज महापालिका सचिव यांचेकडे दाखल केला आणि उप महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे राहूल वसंत दामले यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव यांचेकडे दाखल केला.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदु परब, अरविंद मोरे तसेच माजी पालिका पदाधिकारी, पालिका सदस्य उपस्थित होते.महापौर, उप महापौर निवडणूकीची प्रक्रिया मंगळवार रोजी दु. बारा वाजता महापालिका भवनातील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर सभागृहात मा.विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी सदर सभेसाठी नियुक्त केलेल्या पीठासीन अधिकारी श्रीमती आंचल गोयल, मा.जिल्हाधिकारी (मुंबई शहर) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.


Post a Comment

0 Comments