Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण तालुक्यात रायते येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न. जय मातादी मित्र मंडळ रायते यांचं अनोखा उपक्रम!

महाआरोग्य शिबिर 
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण -मुरबाड राष्ट्रीय  महामार्गालगत रायते येथे रेड स्वस्तिक व स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जय मातादी मित्र मंडळ रायते यांच्या वतीने महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये १९५ नागरिकांनी आपली आरोग्यची तपासणी करून घेतली  यात ई.सी.जी,शुगर,ब्लड प्रेशर,जनरल तपासणी, दंत तपासणी,कार्डीयक चेकअप,स्त्रीरोग तपासणी ऑथॉहाडांची तपासणी,बोन डेंसिटी टेस्ट अशा विविध प्रकारच्या सुविधा ऐ.एस.जी(ASG) हॉस्पिटल कल्याण,साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ, सिद्धेश्वर हॉस्पिटल टिटवाळा यांच्या मार्फत  मोफत पुरविण्यात आल्या

 यामध्ये महिला, पुरुष, लहानमुले यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता, सध्या सर्वत्र आरोग्याची समस्या खुप मोठया प्रमाणत निर्माण झाली असुन मंडळानी अशाच प्रकारांचे उपक्रम राबुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व त्यांना सहकार्य करावे असे आव्हान राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ठाणे ग्रामीणचे जिल्हाउपाध्यक्ष राम सुरोशी यांनी केले आहे

 या कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी,जेष्ठ पत्रकार जैतु मुठोलकर, पत्रकार नारायण सुरोशी,शिवसेना युवा नेते माजी सरपंच संतोष सुरोशी, माजी सरपंच सुनील सुरोशी,माजी उपसरपंच हरेश पवार जेष्ठ नागरिक सोंग्या पवार,काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष अमोल सुरोशी,सुदाम भोईर, अशोक जाधव शरद पवार,श्रीकांत तारमले, विशाल घावट, नागरिक,ग्रामस्य व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी रेड स्वस्तिक सोसायटी,भारत चे सव्यवस्थापकीय संचालक डॉ प्रमोद नांदगावकर ,कमलेश बोनवटे ,मुकुंद नावकर, लखन जगतापस्पर्श फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ पुष्पराज स्वामी कांचन गौंड,डॉ सिद्धेश्वर चामनारू उपस्थित होतेकार्यक्रमाचे आयोजक व जय मातादि मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण पवार,वासुदेव पवार शनी पवार यांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments