Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

 

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार कथोरे यांनी साडे सात कोटीचा निधी मंजूर केला आहे.बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीच प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह संचालककपील थळे, भरत गोधळी, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेआदी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार कथोरे यांनी सांगितले की,बाजार समितीला लागणार या सोयी सुविधा पुरविण्यासाठी महायुतीचेराज्य सरकार कटिबद्ध आहे. मात्र सोयी सुविधा पुरविल्या नंतर बाजारसमितीने उत्पन्न वाढविले पाहिजे.

 बाजार समितीवर महायुतीची सत्ताआहे. संचालक मंडळांनी मला आणि हिंदुराव यांना अधून मधून दिवस ठरून भेट घेतली पाहिजे. काय समस्या आहे. त्या सांगितल्यावर त्यासोडविण्यासाठी सरकार दरबारी लक्ष वेधले जाईल. बाजार समितीचाकारभार चांगला करून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक विक्रेते यांनाबाजार समिती आपलीशी वाटली पाहिजे अशी बाजार समितीआपल्याला तयार करायची आहे. जी या सगळ्यांकरीता लोकाभिमुखआणि उत्पन्नाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असेल.


Post a Comment

0 Comments