लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर माहेरवाशीन असलेल्या गौराई मातेच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांसह गौराई मातेच्या भक्तांना लागतात. त्यातच रविवारी (ता.३१) ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १५ हजार ३२७ गौराई मातेचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होऊन त्या, दोन दिवस मुक्कामी येणार आहेत.यामध्ये सर्वाधिक ६ हजार ५०२ गौरी मातेचे या कल्याण- डोंबिवली या शहरी भागात आगमन होणार आहेत.
गणेश चतुर्थीला ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १ लाख ५७ हजार ८४२ लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्सवात आगमन झाले आहे. त्यानंतर , दीड दिवसांच्या गणरायांना साश्रु नयनांनी निरोप दिला. तसेच या रविवारी म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी माहेरवाशीन गौरी मातेच्या आगमनासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. त्यातच, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १५ हजार ३२७ गौराई मातेचे आगमन धुमधडाक्यात आगमन होणार आहे.यामध्ये सर्वाधिक कल्याण परिमंडळात ६ हजार ५०२, त्याखालोखाल उल्हासनगर- ४ हजार ४८५, ठाणे शहर - १ हजार ७८२, वागळे इस्टेट- १ हजार ६७० आणि भिवंडीत ८८८ गौराई मातांचा समावेश आहे. या आगमनानंतर गौराई मातेचे सोमवारी पूजन होणार असून मंगळवारी त्या परतीच्या प्रवासाला म्हणजे विधीवत विसर्जन होणार आहे.
ज्येष्ठा गौरी पूजन
यावर्षी रविवार ३१ ॲागस्ट रोजी सायंकाळी ५:२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९:५० पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे. - दा.कृ.सोमण, पंचांगकर्ते
या रुपात आणल्या जातात गौरी
गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. हिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.
असे दाखवले जाते नैवेद्य...
गौरीला प्रथेप्रमाणे नैवेद्य अर्पण करतात. काही ठिकाणी चौसष्ट प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. सासरी गेलेली कन्या गौरीच्या सणाला माहेरी येते. तिच्या आवडीचे भोजन केले जाते.


Post a Comment
0 Comments