ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पत्रकार महा समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गरजूवंत व आदिवासी मुला-मुलींना शालेय शैक्षणिक साहित्य (वही,छत्री,पेन,इत्यादी शालेय साहित्य) वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रायते हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे दीपपूजन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. शाळेतील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
तसेच जिल्हा परिषद शाळा नालिंबी येथे व म्हसकळ येथील जीवन संवर्धन आश्रम येथे व शिवभक्त आश्रम शाळा लव्हाली येथे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी आनंदात करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन करून मुलांना प्रोत्साहन दिले.पूर्ण दिवस हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला. त्यावेळी उपस्थित मान्यवर ठाणे उपजिल्हाप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील साहेब,क्राईम बॉर्डरचे संपादक राजेंद्र जी वखरे साहेब, महाराष्ट्र क्रांती 24 तास संपादक नारायण सुरोशी, पत्रकार तानाजी लोणे,शिवाजी भगत,ठाकरे व इतर पत्रकार, रायते गावचे सरपंच समिता संतोष सुरोशी, रायते हायस्कूल मुख्याध्यापक शिंदे सर, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका चित्रा बोंदे मॅडम, शिक्षिका जाधव मॅडम, राठोड मॅडम,शिवभक्त आश्रम शाळा अंबरनाथ लव्हाळी रमेश बुटेरे सर,शिवभक्त आश्रम शाळा अंबरनाथ लव्हाळी संचालिका सायली बुटेरे, गीतांजली अहिरे मॅडम,हरेश पवार,जयराम घरत व इतर ठाणे जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पूर्ण दिवस कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.




Post a Comment
0 Comments