कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
१८ जागांसाठी होणार निवडणूक.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जून होती. उमेदवारांनी 154 अर्ज दाखल केले होते. सोमवार, 2 जून रोजी छाननीमध्ये 14 अर्ज बाद झाले असून, 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवार 3 ते 7 जून या कालावधीत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 संचालक पदे आहेत, ज्यात 11 शेतकरी प्रतिनिधी, 4 ग्रामपंचायत मतदार संघ, 2 व्यापारी आणि 1 हमालमाथाडी प्रतिनिधी यांचा समावेश आहे. उमेदवारांना 18 जून रोजी निशाणी वाटप केले जाईल आणि 29 जून रोजी मतदान होईल. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे भविष्य या निवडणुकीतून ठरणार आहे.
संचालक पदाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय पक्ष, विविध संघटना आणि सामान्य वर्गातील उमेदवार असल्याचे दिसते.
निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी. हरल यांनी सांगितले की, 154 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी छाननीनंतर 14 अर्ज बाद झाले आहेत. उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल.

Post a Comment
0 Comments