Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू !

 

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

कल्याण -  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 4/J प्रभागात   सप्तशृंगी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’ या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. 

आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली.

घटनेनंतर तात्काळ केडीएमसी आपत्कालीन पथक, फायर ब्रिगेड, सिव्हिल डिफेन्स आणि TDRF टीम घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

 मृतांची संख्या: ६

प्राप्त माहितीनुसार मृत व्यक्तींची नावे  : 

१.प्रमिला साहू २. नमस्वी शेलार. ३. सुनीता साहू ४. सुजाता पाडी ५. सुशीला गुजर ६. व्यंकट चौहान. 

 जखमींची संख्या: ६

१.विनायक पाडी २. श्राविल शेलार ३. अरुणा गिरनारायण  ४.यश क्षीरसागर ५. निखिल खरात ६. श्रद्धा साहू 

महापालिका क्षेत्रात ५१३ इमारती धोकादायक/ अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.

 महापालिका परिक्षेत्रात ३० पेक्षा जास्त जुन्या, इमारतीतील इमारत धारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

या वेळी स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड ,महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त  योगेश गोडसे, उपायक्त संजय जाधव, अवधूत तावडे, प्रसाद बोरकर, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, तहसीलदार सचिन शेजाळ, माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी/ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments