Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

पुढील ५ वर्षासाठी कल्याण तालुक्यातील संरपच सोडती जाहीर.

 कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी

ग्रामीण भागातील वर्चस्व आणि राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील चांगल्याच चुरशीच्या होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीत सरपंच होण्याचा मान कोणाला मिळणार याकडे डोळे लावून बसलेल्या कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. मंळवारी आचार्य अत्रे नाट्य मंदिर कल्याण येथे प्रांताधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या सोडतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून काही इच्छुकांनी हजेरी लावली होती.

कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची सोडत मंगळवारी पार पडली. चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या या सोडतीत शासनाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित ग्रामपंचायतीची लोकसंख्येच्या निकषानुसार निवड करण्यात आली. यात अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी वासुन्द्री आणि भिसोळ तर खुल्या गटासाठी कांबा या ग्रामपंचायतिची सोडत लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली. तर अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी जांभूळ मोहिली आणि काकडपाडा तर वाहोली ग्रामपंचायत अनुसूचित जमाती साठी राखीव करण्यात आले आहे. तर नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव ठेवण्यात आले असून यातील दहिवली, गोवेली रेवती, निंबवली मोस, उशीद आराळे आणि वरप या ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी महिला सरपंच बसणार आहेत.

 तर उर्वरित चवरे, दहागाव, केळणी कोलम, म्हसकळ अनखर, रुंदे आंबिवली आणि वसत शेलवली या ५ ग्रामपंचायती ओबीसी साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित २४ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी असून यातून कोणीही सदस्य सरपंच होऊ शकेल. आपटी मांजर्ली, गेरसे, गुरवली, घोटसई, कोसले, मामणोली म्हारळ, नडगाव दानबाव, नांदप, राया ओझर्ली, रायते पिंपळोली, आणि वेहळे या ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गामधील महिलासाठी राखीव असून बापसई, बेहरे, फळेगाव, कुंदे, खोणी वडवली, मानिवली, पळसोली, पोई, रोहण अंताडे, सांगोडे, उतने चिंचवली, वडवली शिरढोण या ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिल्या आहेत. संपूर्ण सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.

दरम्यान सोडतीनंतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत निवृत्त सैनिक आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त गजानन माने यांनी माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी गुजर, तहसीलदार शेजाळ यांच्यासह महापालिका उपायुक्त संजय जाधव, एनसीसी कॅडेट उपस्थित होते. सोशल मिडीयाचा वापर मर्यादित स्वरुपात करत आपली गोपनीय माहिती उघड होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन यावेळी उपस्थिताना करण्यात आले.

Post a Comment

0 Comments