Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

 मातृदिनानिमित्त निसर्गाला आदरांजली..!

  ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा “मातृ दिन” एका विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. 



या कार्यक्रमात जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषणकर्ता असलेल्या निसर्गाचेही आदराने स्मरण केले जाणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृ दिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणे, हा आहे.  या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढविणे आणि त्या दिशेने कृती करण्याची प्रेरणा देणे अपेक्षित आहे.


यासाठी खूप छान प्रतिसाद मिळाला असून पर्यावरण तज्ञ विजयकुमार कट्टी यांनी विशेष मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जेष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, दीपक दळवी, ठाणे शहर हौसिंग सोसायटी फेडरेशन चे कस्बर ऑगस्टीन, भरत अनिखंडी, महेंद्र मोने, श्री. मिस्त्री, भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशन चे मोहन शिरकर,अमन कोईरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक श्री.वालावलकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित आहेत.


Post a Comment

0 Comments